भारत हा दक्षिण अशियामधील एक प्रमुख देश आहे. जगातील प्राचीन सांस्कृतीचा वारसा जपणारा हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वात मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिठ्य आहे.
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपुर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती हाऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीत रुपांतर झाले.[१]. इसवीनपूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खनान सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ वैदिक काळ म्हणुन गणला जातो (इ.स पूर्व १५०० ते इ.स पूर्व ५००). काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदीक काळ सूरू झाला[२]. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदीक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदीक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदीक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदीक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदीक काळात सिंधू काठची वैदीक संस्कृती गंगेच्या खो-यात पसरली.
अजंठा येथील भित्तीचित्रेइसवीसनपूर्व तिसर्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसर्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदीक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तामीळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य. महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजंठा, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया देशापर्यंत पोहोचला होता.
११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण ही मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघलांचे राज्य सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्नस्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरु झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करुन भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून् सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडीया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.[६]. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटीश सरकार कडे गेला.
Mahatma Gandhi (right) with Jawaharlal Nehru, 1937. Nehru would go on to become India's first prime minister in 1947.लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरु केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अहिंसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. [७] सरते शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. [८] २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते 'जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र' अशी आज बिरुदावली मिरवत आहे. [९]
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारतातील दहशतवादही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारतातील विविध शहरात आतंकवादी हल्ले झाले आहेत. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. India is a founding member of the Non-Aligned Movement and the United Nations (as part of British India). In 1974, India conducted an underground nuclear test.[१०] This was followed by five more tests in 1998, making India a nuclear state.[१०] Beginning in 1991, significant economic reforms[११] १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरुन सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणिय कामगीरी केली आहे. [१२]
Saturday, January 2, 2010
Global Warming
जागतिक तापमानवाढ
जागतिक तापमानवाढ (Global warming) पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.
इतिहास
पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्यावेळेसची तापमानवाढ हे पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्या ही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात अमूलाग्र बदल झाले होते.
सद्य स्थिती
सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार असणार आहे. [ संदर्भ हवा ] ही तापमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. या लेखात हरितवायू परिणाम म्हणजे काय व नेमकी कश्याने तापमान वाढते हे नमूद केलेच आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमूलाग्र प्रयत्नांनीच शक्य आहे आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते इ.स. २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी सोडता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे[१]. हरित वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिका, युरोप, चीन, जपान हे देश जवाबदार देश आहे. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व या देशाने अजूनही या क्योटो प्रोटोकॉल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे प्रयत्न करणार्या देशांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल या बाबतीत शंका आहेत.
कारणे
हरितगृह परिणाम
हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[२]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून बंदिस्त असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात उन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीत वापरतात[३]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उर्जालहरी परावर्तीत करु शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायू असे आहेत जे उर्जालहरी परावर्तीत करु शकतात. या उर्जालहरींना इंग्रजीत इन्फ्रारेड लहरी असे म्हणतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणार्या ऊर्जेतया इन्फ्रारेड लहरींचा समावेश असतो. पृथ्वीवर येणा-या बहुतेक इन्फ्रारेड लहरी व इतर लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात सोडल्या जातात. परंतु काही प्रमाणातील या लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळात पृथ्वीला उर्जा मिळते. या परावर्तीत इन्फ्रारेड लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायू वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळेच मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली.
सौर उर्जेचा ताळमेळहे वायू मुख्यत्वे पृथ्वीवरील तापमान उबदार ठेवण्यास मदत करतात
क्रं वायू तापमानवाढ
१ पाण्याची वाफ २०.६°
२ कार्बन डायॉक्साईड ७.२°
३ ओझोन २.४°
४ डायनाट्रोजन ऑक्साईड १.४°
५ मिथेन ०.८°
६ इतर वायू ०.६°
एकूण सर्व एकत्रित हरितवायू मिळून ३३°
वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायू आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बर्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायू म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[४].
हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ
कार्बन डायॉक्साईड व तापमानवाढीचा संबंधवरील तक्यात नमूद केल्याप्रमाणे हरितगृह परिणामात दुसरा महत्वाचा वायू म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरु झाले. इ.स. १९७० च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६० च्या सुमारास झाली[५] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएम च्या जवळ पोहोचले आहे[६]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्च्लेषणा नंतर तयार झालेला कोळसा व खनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्यहावतपणे जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोल व डिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करुन कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएम च्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखील वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृती जोरदार पुरावा आहे.
केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वातावरणातील प्रमाण वाढत आहे. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [४]इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे. [७]त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात.
इतर कारणे
सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता (solar radiation)वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे.
ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखील जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखील होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो.
एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणाम चालू मोसमी वार्यांना अवरोध निर्माण होउन भारतात दुष्काळ पडतो.[८]. या परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाउ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता.[९]

Tuesday, December 1, 2009
प्रेम म्हणजे काय असते ?
प्रेम म्हणजे काय असतं ?………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…
प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..
प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..
कोणी तरी बोललेच आहे
“प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं”…………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…
प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..
प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..
कोणी तरी बोललेच आहे
“प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं”…………..
प्राणायाम- का व कशासाठी?

भारतीय ऋषिमुनींनी संस्कृतीचं महत्त्व भारतीयांच्या मनावर बिंबवलं. मानवाच्या आंतरिक शक्तीचा विकास होणं गरजेचं आहे,अन हा विकास मानवी शरीराच्या विकासातून होऊ शकतो, हे त्यांना जाणवलं होतं. त्यामुळेच खाण्याच्या, विश्राम करण्याच्या तसेच शरीराचं निकोपत्व कायम ठेवण्याच्या अनेक पद्धतींचा त्यांनी शोध लावला होता. अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नांतून अन शोधांतून त्यांनी मानवी शरीराची व मनाची ताकद, सकसता अन पावित्र्य वाढविण्यासाठी कसरत व योगाच्या विशेष पध्दतींचा विकास केला होता. ऋषीमुनींनी स्पष्ट केलं की आपण देवाला प्राणायमाने प्राप्त करुं शकतो. कारण या अवस्थेत बुध्दी विचारांना शरण जाते, कुठलीही विघ्ने न येता आपण प्राणायमाने चित्त स्थिर करु शकतो, इथं आपल्या ऐच्छिकाशी, देवाशी तादाम्य पावण्याची स्थिती असते. सुर्याच्या तीन अवस्थांशी याचं देणं घेणं चालतं. सकाळी उठताना उगवत्या सुर्याची पूजा, जी दिवसाची कामे करायला प्रेरणा देते. दुपारचा सूर्य जेवणाने आपली शक्ती वाढवून काम करायला ताकद देतो तर संध्याकाळचा मावळता सूर्य म्हणजे त्या सर्व शक्तिमान परमेश्वराची कृपा, त्याचे आभार, कारण त्यानेच दिवसाची सर्व कामे पूर्ण केली. ऋषिमुनींच्या मते पहाटे तीन ब्रम्हमुहूर्त असतो, ज्यावेळी प्रकृती आपल्या सर्वोत्तम पावित्र्यात असते, प्राणायमासाठी ही उत्क्रुष्ट वेळ आहे.
महाराष्ट्राचे मानबिंदू – छत्रपती शिवाजी महाराज

शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे.
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.
मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला. जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या १२ मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.
त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले. हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.’ – या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे’ याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन् खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन – या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.
स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती. लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!
स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत. शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. ६ महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व ६ महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला २ वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.
सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, … यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.
जगद्गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट १६४७ साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक १६४९ मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा’ असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.
स्वराज्य खूप मोठे झाले होते. अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. १६७४ सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!
छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी
- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,
- साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
- स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
- आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
- तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. ०३ एप्रिल, १६८० रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला.
मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे.
शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल ३० वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले.
शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.
स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।
आनंदवनभुवनी।।
त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।
आनंदवनभुवनी।।
येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।
आनंदवनभुवनी।।
भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।
आनंदवनभुवनी।।
येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।
आनंदवनभुवनी ।।
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी।।
बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।
आनंदवनभुवनी।।
आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।
स्वाइन फ्लुपासून अशी काळजी घ्या…
गेल्या दोन महिन्यांत अटोक्यात येण्याऐवजी स्वाइन फ्लूची साथ हातपाय पसरताना दिसते आहे. भारतात या साथीची तीव्रता कमी असली तरीही त्याबद्दल माहिती
असणे, उपाययोजना करणे कसे आवश्यक आहे
* स्वाइन फ्लूची साथ जगभरातील १०२ देशांत पसरली आहे.
* स्वाइन फ्लूच्या सध्याच्या उदेकाचे मूळ तज्ज्ञांच्या मते सप्टेंबर २००८मध्ये असावे. या काळात स्वाइन फ्लूचा एच वन एन वन विषाणू प्राथमिक अवस्थेत असावा, तो प्रभावशाली होत मग त्याची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला लागली असावी.
* स्वाइन फ्लूची साथ असल्याचे ११ जून २००९ रोजी अधिकृत घोषित करण्यात आले. तर एकूण ७६ देशांत ३९ हजार ६२० व्यक्तींना या रोगाची लागण झाली असून १६७ मृत्यू झाल्याचे १७ जून रोजी डब्ल्यूएचओने जाहीर केले.
* या रोगाची लागण झालेल्या एकूण व्यक्ती आणि त्यामुळे झालेले मृत्यू याबद्दलच्या र्वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (इसीडीसी) या दोन संस्थांच्या आकडेवारीत थोडी तफावत आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार १६० आहे तर २३१जण मृत्यूमुखी पडले आहेत. इसीडीसीच्या मते ५२ हजार ९६२जणांना लागण झाली असून २३२जण मृत्यूमुखी पडले आहेत. काहींच्या मते मृतांचा आकडा २७२पर्यंत आहे.
* स्वाइन फ्लूचा पहिला जोर मेक्सिकोत होता. २४ मे २००९पर्यंत झालेल्या मृत्यूंत ९० टक्के या देशातले होते.
* अमेरिकेत स्वाइन फ्लूच्या २१ हजार ४४९ केसेस नोंदवल्या गेल्या असून ८७ मृत्यू झाले आहेत. या देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणावर, ६ राज्ये आणि पोतोर् रिकोत मध्यम प्रमाणात, कोलंबिया जिल्हा व १३ राज्यांत कमी प्रमाणात आणि २० राज्यांत अंशत: स्वाइन फ्लूच्या एच वन एन वन विषाणूने शिरकाव केला आहे.
* एरव्ही सर्वसाधारणपणे होणाऱ्या फ्लूचे थैमानही दुर्लक्षिण्यासारखे नाही. या ‘साध्या’ फ्लूमुळे जगभरात दरवषीर् अडीच ते पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतात.
* भारतात आतापर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ६३ व्यक्ती आढळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ये जा असलेल्या मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्लीसारख्या शहरांत त्यांचे प्रमाण अधिक आहे. या रोगाचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी देशातल्या २२ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कडक तपासणी केली जात आहे. आतापर्यंत २२ लाख प्रवाशांना चाचण्यांतून जावे लागले असून त्यासाठी उभारलेल्या ७७ काऊंटरांवर २२४ डॉक्टर आणि ११२ पॅरामेडिकोजची नियुक्ती केली गेली आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणे
सर्वसाधारण फ्लूप्रमाणे ताप, सदीर्खोकला, डोकेदुखी, सांधे व स्नायूंमध्ये वेदना, घशाला कोरड पडणे, हुडहुडी भरणे, थकवा, सतत नाक वाहणं, अतिसार आणि उलट्या होणे ही लक्षणे या फ्लूमध्येही दिसतात. त्यामुळे ‘असेल साधा फ्लू’ असे समजून दुर्लक्ष करू नका, लगेच डॉक्टरांकडे जा व मेडिकल तपासण्या करून घ्या. लहान मुलांमध्ये ओठ आणि त्वचा काळीनिळी पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, जोराचा श्वास लागणे, अति झोप येणे, अस्वस्थपणा वाढणे ही लक्षणे गंभीर स्वरूपाची आहेत. तर मोठ्या माणसांत श्वास तोकडा पडणे, छातीत अथवा ओटीपोटात वेदना होणे, झोपाळू वाटणे ही लक्षणे गंभीर आहेत. अर्थात लक्षणे गंभीर होण्याची वाट पाहायचीच कशाला?
स्वाइन फ्लू कसा पसरतो?
स्वाइन फ्लू झालेल्या व्यक्तीला झालेली सदीर् अथवा खोकला, त्याला येणाऱ्या शिंका यांचा संसर्ग झाल्यास अथवा दूषित वस्तूला/पृष्ठभागाला हात लागल्यानंतर मग त्याच हाताचा स्पर्श नाक अथवा तोंडाला झाल्यास संसर्ग होऊ शकतो. डुकराचे मटण खाल्ल्याने स्वाइन फ्लू होत नाही.
स्वाइन फ्लूवरील उपचार
स्वाइन फ्लूवर सर्वसाधारण फ्लूचेच उपचार केेले जातात. डॉक्टरी सल्ल्यानुसार विषाणू प्रतिबंधक (अँटीव्हायरल) औषधांचे डोस घ्यावे लागतात. आजाराच्या प्रमाणानुसार रोग्याला एकांतातही (क्वारंटाइन) देखरेखीखाली ठेवावे लागते. डब्ल्यूएचओच्या महासंचालक मार्गारेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार २००९स्वाइन फ्लूवरील लशीचा पहिला डोस येण्यासाठी सप्टेंबर २००९ उजाडेल. तेव्हाही लस उपलब्ध झालीच तरी ती अतिशय मर्यादित प्रमाणात असल्याने साथीच्या व्याप्तीला कितपत पुरी पडेल याची शंकाच आहे. येत्या वर्षभरात स्वाइन फ्लूचे एच वन एन वन विषाणूंची संख्या प्रतिकारक्षमता अधिक वाढली असेल आणि या लशीला ते दाद देणार नाहीत अशी भीतीही व्यक्त होते आहे.
काही तज्ज्ञांच्या मते ज्यांना १९५७पूवीर् फ्लू होऊन गेला आहे, त्यांच्या शरीरात फ्लूच्या विषाणूंशी लढणाऱ्या अँटीबॉडीज अधिक प्रभावी असतात. अशा व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता कमी असते, अर्थात त्यांना लागण होणारच नाही अशी काही खात्री देता येत नाही.
स्वाइन फ्लूचा इतिहास
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (सीडीसी)वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार स्वाइन फ्लूची पहिली नोंद १९१८ साली झालेली दिसते. या साथीची लागण कोट्यवधी लोकांना झाली असल्याचा अंदाज त्यावेळच्या उपलब्ध असलेल्या नोंदीवरून काढता येतो. स्वाइन फ्लूच्या या भीषण थैमानात सुमारे १० कोटी लोकांना आपले जीव गमवावे लागले असल्याची माहिती मिळते. अर्थात या माहितीत काही विसंवादी आकडेवारीही दिसते. पण याच काळात एच वन एन वन या विषाणूची ओळख आधुनिक विज्ञानाला झाली. त्यानंतर १९७६ सालीही या रोगाचा उदेक झाल्याच्या नोंदी आहेत. १९७७ साली लागण झालेल्या रशियन फ्लूमध्येही एच वन एन वन विषाणूंचे अस्तित्व होते.
एच वन एन वनपासून बचावण्यासाठी
* खोकला किंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर ठेवा. वापरून झाल्यावर टिश्यू पेपर टाकून द्या.
* खोकला, शिंक आल्यावर नाक पुसून हात साबणाने स्वच्छ धुवा.
* डोळे, नाक, तोंड यांंना सतत हात लावू नका.
* आजारी व्यक्तींच्या निकट संपर्कात फार काळ राहू नका.
* फ्लू किंवा फ्लूसदृश रोगाने आजारी असाल तर लक्षणे दिसू लागल्यावर ७ दिवस अथवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा. यामुळे अन्य लोकांना आजाराची लागण होणार नाही व साथ पसरणार नाही.
* खबरदारी घेण्यासंदर्भात आरोग्य खाते वेळोवेळी ज्या सूचना करेल किंवा आदेश देईल त्याचे तंतोतंत पालन करा.
Contact:
Mr.Pathan M.Y
Shivaji Colony,Shirval
Tal:Khandala,Dist:Satara
Mob:9890321698

किल्ले पुरंदर

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याला चौफेर माच्या आहेत. किल्ल्याचे स्थान १८.२८ अंश अक्षांश व ७४.३३ अंश रेखांश वर स्थित आहे. किल्ला पुण्याच्या आग्रेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.
इतिहास : अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कर्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते. ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’ मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, ‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो.’ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन नीट खानावरी चालिला. खानावरी तलवरीचा वार करावा तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’ खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना ावे लागले. त्यांची नावे अशी, १. पुरंदर २. रुद्रमाळ किंवा वज्रगड ३. कोंढाणा ४. रोहीडा ५. लोहगड ६. विसापूर ७. तुंग ८. तिकोना ९. प्रबळगड १०. माहुली ११. मनरंजन १२. कोहोज १३. कर्नाळा १४. सोनगड १५. पळसगड १६.भंडारगड १७. नरदुर्ग १८. मार्गगड १९. वसंतगड २०. नंगगड २१. अंकोला २२. खिरदुर्ग (सागरगड) २३. मानगड ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
Subscribe to:
Posts (Atom)