पंचांग हे भारतीय कालगणनेचे कोष्टक आहे. कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग.हा मुळचा संस्कृत शब्द आहे.(पंचानाम् अंगानां समाहार=ज्यात पाच अंगांचा समावेश असतो तो/ ती/ ते) यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय यात दिलेले असतात.
गर्भाधान संस्कार * बारसे * मुंज * विवाह * गुणमेलन * मुहूर्त * सण * वार * व्रत वैकल्ये * मकर संक्रांत * ग्रह उपासना * नवग्रह स्तोत्र * चंद्र व सूर्य ग्रहणे * ग्रहपीडा * दाने व जप * भूमीपूजन * पायाभरणी * गृहप्रवेश * वास्तुशांती * अशौच निर्णय * हवामान व पर्जन्यविचार * नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत * संत जयंत्या पुण्यतिथ्या * जत्रा * यात्रा * मासिक भविष्य * राजकीय व सामाजिक भविष्ये * धर्मशास्त्रीय शंका समाधान * ब्राह्मणातील शाखा उपशाखा * त्यांचे गोत्र वंशावळ * ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक * ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती * रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती * गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके* ग्रह दशा * ग्रहांच्या अंतर्दशा * लग्नसाधन * नवमांश * अवकहडा चक्र * राशींचे घातचक्र इ. अशा अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.
तिथी
चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी असतो.
तिथि क्षय व वृद्धी
पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची परस्परावलंबी सापेक्ष गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसर्या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते.
वार
होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थानेही हा भाग घेतला जातो. प्रत्येक होर्याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे. "उदयात उदयेंदु वारः" एका सुर्योदयापासुन दुसर्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे. धार्मिक कारणांसाठी सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ केला जातो.
"आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवी, शुक्र, बुध, चंद्र.
शनीवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होर्याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.
नक्षत्र
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून राशी होतात. तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक तार्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात.
योग
चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत
करण
करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण.
पक्ष
पंचांगाचे मुख्य दोन पक्ष सायन आणि निरयन.
महिने
१) चैत्र ३०/३१ दिवस २२ मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)
२) वैशाख ३१ दिवस
३) ज्येष्ठ ३१ दिवस
४) आषाढ ३१ दिवस
५) श्रावण ३१ दिवस
६) भाद्रपद ३१ दिवस
७) आश्विन ३० दिवस
८) कार्तिक ३० दिवस
९) मार्गशीर्ष ३० दिवस
१०) पौष ३० दिवस
११) माघ ३० दिवस
१२) फाल्गुन ३० दिवस
राफेल चे एफमेरीज हे खर्या अर्थाचे सायन पंचांग असते. पाश्चात्य ज्योतिष हे सायनाधारित आहे. कालनिर्णय हे निरयन पंचांग आहे.
कालगणना
६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र
३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष
१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग
२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग
३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग
४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग
४ युगे = १ महायुग
७१ महायुगे = १ मनु
१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)
३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य
१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका
१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष
१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष
Saturday, January 23, 2010
दिवाळी
धनत्रयोदशी
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दीव्यानी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लाउन त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
नरक चतुर्दशी
नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन नरकचतुर्दशी हा दिपावलीतील एक दिवस आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी या अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. `हिरण्यमयी, तेजस्वी, जीवनपोषक व चैतन्यमयी अशा लक्ष्मीला समोरच्या दाराने वाजत-गाजत आणून तिचे गृहात वास्तव्य करणे व अशा लक्ष्मीचे पूजन करणे म्हणजे लक्ष्मीपूजन.
लक्ष्मीपूजन
आश्विन अमावास्या - दिपावली दुसरा दिवस
या दिवशी प्रदोषकाळी(संध्याकाळी)लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे,शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा - दिपावली , तिसरा दिवस)
बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीया -(यमद्वितिया) दिपावली , चौथा दिवस
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस. या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणी सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' टाकुन बहिणीचा सत्कार करतो.

Friday, January 15, 2010
आर्यभट (पहिला)
भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात विहार करू लागला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी ही घटना! पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते 'आर्यभट'!
आर्यभट हा भारताचा महान खगोलविद होता, खगोलीय गणिती होता, खगोलशास्त्राचा प्रणेता होता. आर्यभटाचा जन्म शके ३९८ ( इ. स. ४७६ ) मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. त्याचे बालपण व उर्वरित आयुष्यकाल ह्याच नगरीत व्यतीत झाला. खगोलशास्त्रज्ञ म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे.
आर्यभटीय ग्रंथ
आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोलशास्त्रीयग्रंथात पहिल्या आर्यभटाच्या 'आर्यभटीय' किंवा 'आर्यसिद्धांत' ह्या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही. 'आर्यभटीय' हे नाव त्याला आर्यभटानेच दिले आहे. आर्यभटाचे शिष्य वराहमिहीर, लल्ल वगैरे त्यास 'आर्यसिद्धांत' म्हणून संबोधायचे.
'आर्यभटीय' ग्रंथात 'दशगीतिका' व 'आर्यष्टशत' असे दोन भाग आहेत. हे दोन भाग निरनिराळे ग्रंथ आहेत असे काही तज्ज्ञांचे मत आहे. परंतु ए दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे दोन्ही मिळून एकच सिद्धांत मानणे सयुक्तिक होय. त्याचे चार पाद असून त्यात अवघे एकशे एकवीस श्लोक आहेत.
दशगीतिका भागात तेरा श्लोक असून त्यातील तीन प्रार्थनापर आहेत. उर्वरित दहा श्लोकांत ग्रहभगणासंबंधीचे विवेचन आहे. ( भगण म्हणजे ग्रहांची नक्षत्रमंडळातून एक पूर्ण प्रदक्षिणा ) ह्या ग्रंथाचे चार पाद असे : १) गीतिका पाद, २) गणितपाद, ३) कालक्रियापाद, ४) गोलपाद.
गीतिकापादात अक्षरांच्या आधारे संक्षेपात संख्या लिहिण्याची स्वनिर्मित पद्धती अवलंबलेली आहे. खगोलशास्त्र किंवा गणित श्लोकबद्ध लिहावयाचे असेल तर ही गोष्ट आवश्यक असते. गणितपादात अंकगणित, बीजगणित, रेखागणित ह्यांचे सूत्ररूप नियम अवघ्या तेहतीस श्लोकात समाविष्ट केलेले आहेत. संख्यालेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ह्याचे विवेचन त्यात असून त्रिभुज, वृत्त व अन्य क्षेत्रे ह्यांचे क्षेत्रफळ, घनफळ, भुज ज्या साधन व त्या संबंधीचा विचार, गणितश्रेणी, वर्गश्रेणी, त्रैराशिक पद्धती, बीजगणित पद्धती, विविध कुट्टके असे अनेक विषय आहेत. कालक्रियापादात कालगणना, युगे, कालविभाजन, ग्रहांची मध्यम व स्पष्ट गती वगैरेंचा समावेश आहे.
आर्यभटाने 'आर्यभटीय' ग्रंथाची रचना वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी केली. यावरून त्याच्या कुशल बुद्धिमत्तेची व प्रतिभेची कल्पना येऊ शकेल. आर्यभटीय ग्रंथ संक्षिप्त असला तरी त्याची रचनापद्धती अत्यंत सुसंबद्ध व शास्त्रीय असून त्याची भाषा अत्यंत सुस्पष्ट व अचूक आहे. आर्यभटाचे सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवास येतात काय? ह्या प्रश्नाचे उत्तर होय असेच द्यावे लागते. दृक्प्रत्ययावरून देखिल आर्यभटाची योग्यता फार मोठी आहे ते पटते. आर्यभटानंतरच्या खगोलविदांनी त्यांच्या ग्रंथरचनेतील भाग आपल्या विवेचनासाठी घेतला. अल्बेरुणीने अरबी भाषेत हे ज्ञान या ग्रंथावरूनच नेले. डॉ. केर्न ह्यांनी १८७५ मध्ये हॉलंड देशात लेडेन येथे ह्या सिद्धान्तावर टीकाग्रंथ लिहिला. भारतात सुर्ययज्वनाने लिहिलेली टीका विशेष प्रसिद्ध आहे. बृहत्संहिता टीकेत उत्पलाने 'आर्यभटीय' ग्रंथातील अवतरणे घेतलेली आहेत.
आर्यभटीय ग्रंथाची भाषा
आर्यभटीय ग्रंथ व त्या पूर्वीचे खगोलशास्त्रीय ग्रंथ ह्यांच्या भाषेत फरक आहे. आर्यभटाने आपल्या आर्यभटीय ग्रंथात संख्यादर्शनासाठी पूर्वीप्रमाणे भू = १, राम = ३ अशा शब्दांचा वापर केलेला नाही तर अक्षरांचा वापर केलेला आहे. आर्यभटाने एका सूत्रात सर्व संख्या क्रमशः स्थानापरत्वे दसपट होतात असे सांगितले आहे. त्याशिवाय त्याने विशिष्ट अक्षरांना ठराविक किंमत व स्वरांना ठराविक स्थाने देऊन सर्व संख्या अक्षरलिपीत लिहिण्याची सोय केलेली आहे.
वर्गाक्षराणी वर्गे ऽ वर्गे ऽ वर्गाक्षराणी कात ङ मौ यः ।
खद्विनवके स्वरा नववर्गे ऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥
एकं, शतं, दशसहस्त्र, दशकोटी, खर्व, महापद्म, जलाधी, मध्य ही वर्गस्थाने समजावीत व त्या ठिकाणी क, ख, ग, ------ पासून प, फ, ब, भ, म पर्यंत अक्षरे म्हणजे क, च, ट, त, प वर्गातील अक्षरेच घालावीत व त्यांच्या किंमती क = १, क = २ ते म = २५ अशा समजाव्यात. दशसहस्त्र, लक्ष, कोटी, अब्ज, निखव, शंकू, अंत्य, परार्ध ही अ वर्गस्थाने समजावीत. ह्या य पासून ह पर्यंतची अक्षरे घालून त्यांच्या किंमती ३० पासून ते १०० पर्यंत समजाव्यात.
याचे अधिक स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :
अ = १
ए = १००००००००००
इ = १००
ऐ = १००००००००००००
उ = १००००
ओ = १००००००००००००००
ऋ = १००००००
औ = १००००००००००००००००
लू = १०००००००००
क = १
च = ६
ट = ११
त = १६
प = २१
य = ३०
श = ७०
ख = २
छ = ७
ठ = १२
थ = १७
फ = २२
र = ४०
ष = ८०
ग = ३
ज = ८
ड = १३
द =१८
ब = २३
ल = ५०
स = ९०
घ = ४
झ = ९
ढ = १४
ध =१९
भ = २४
व = ६०
ह = १००
ड = ५
ञ = १०
ण = १५
न =२०
म = २५
भारतीयांची दशमानपद्धती
आर्यभटाची ही अक्षरांक परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. आजच्या दशमानपद्धतीचा आढळ त्यामध्ये दिसून येतो. आज जगमान्य झालेली अंकपद्धती ही दशमानपद्धती म्हणून ओळखली जाते. ह्या पद्धतीमध्ये स्थानापरत्वे अंकाची किंमत बदलते. उजवीकडून डावीकडे जी स्थाने असतात त्यांची किंमत दसपटीने वाढत जाते. आर्यभटाच्या पूर्वीपासून ही पद्धत भारतात रुढ असावी. ग्रीक व रोमन संख्यादर्शनासाठी अक्षरलिपी वापरीत. त्यामूळे युरोपात अंकगणिताचा विकास मंदावला. भारतात दशमानपद्धतीच्या वापरामूळे तसेच अंकांना दहा चिन्हे वापरून संख्या लिहिली गेल्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अधिकाधिक सुकर करणे शक्य झाले.
अक्षरांनी संख्या दर्शविण्याच्या विविध पद्धती आर्यभटच्या काळात रुढ होत्या. त्यांना कटपयादी असे म्हटले जाते. थोडक्यात संख्या दाखविण्यासाठी ही परिभाषा कितीही उपयुक्त असली तरी पुनरावृत्तीत तिच्यामुळे ग्रंथात चूका होण्याचा संभव वाढतो व कालांतराने ग्रंथाची उपयुक्तता, मेळ न बसल्यामुळे कमी होते.
आर्यभट व टॉलेमी
टॉलेमी व त्याच्या पूर्वीचे ग्रीक खगोलशास्त्रज्ञ ह्यांना भुज ज्या ( sines ) ठाऊक नव्हत्या. हे खगोलशास्त्रज्ञ ज्या ( chords ) चा उपयोग करीत असत. आर्यभटीय ग्रंथावरून असे दिसून येते की इ. स. ५०० मध्ये भारतीयांना भुज ज्यांची पूर्ण कल्पना होती. आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. त्यात ९० अंशाची भुज ज्या जी १ त्यांची किंमत ३४३८ धरून त्या प्रमाणात ३१११०, ७११०, १११० ह्या प्रमाणे ९० अंशापर्यंतच्या कोनाच्या भुज ज्या २२५, २२५+२२४, २२५+२२४+२२२ ह्या प्रमाणात असल्याचे प्रतिपादन केले आहे. प्रो व्हिटन ह्या पाश्चात्य पंडिताने आर्यभटाने ही टॉलेमीची उसनवारी केली असल्याचे म्हटले आहे, पण त्यात काही तथ्य नाही. टॉलेमीच्या कोष्टकात काटकोनाचे साठ भाग धरून चाप घेतलेले आहेत. तर आर्यभटाने काटकोनाचे ३४३८ भाग कल्पून अर्ध ज्या काढल्या आहेत, तेव्हा आर्यभटाने केवळ भुज ज्या उसनवारी घेतल्या असतील असे म्हणणे अन्यायाचे आहे. आर्यभटाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. वृत्ताचा व्यास व परिघ ह्यांचे गुणोत्तर [ π ] ह्या अक्षराने दर्शवितात. त्याची किंमत पूर्णपणे व्यक्त कर्ता येत नाही. ती अंदाजे ३. १४१६ अथवा २२/७ असे आपण म्हणतो. आर्यभट ची किंमत ६२८३२/२००० एवढी देतो. म्हणजे आर्यभटाने ती ३.१४१६ एवढी सूक्ष्म दिलेली आहे. गणितपादात त्याने २००० व्यासाचा परिघ ६२८३२ सांगितला आहे व तो ही त्याच्या मते जवळजवळ असा आहे.
टॉलेमीने मानलेली संपातगती ( वर्षास ३६ विकला ) गृहीत धरून पाश्चात्य पंडीत टॉलेमीची माने काढतात. ह्या मानांचे भारतीय सिद्धान्तातील मानाशी मुळीच साम्य नाही. त्यावरून आर्यभटीय ग्रंथातील ग्रहगती-स्थिती स्वतंत्र आहे असे म्हणता येते.
आर्यभटाचे वर्षमान
आर्यभटीय ग्रंथाच्या दर्शगीतिका विभागात ग्रहभगणाआदी माने आहेत. ग्रहगतिभगणांची मूळ सूर्य सिद्धान्तातील ग्रहगतिभगणांशी तुलना केली असता आर्यभटाने गुरू व बुध वगळता अन्य ग्रहांचे भगण मूळ सूर्यसिद्धांताप्रमाणेच घेतले आहेत. बुधाचे वीसने अधिक असून गुरुचे चारने अधिक आहेत. आर्यभटाची युगपद्धती अन्य सिद्धान्ताहून काहीशी भिन्न आहे. आर्यभटाचे महायुग ४३,२०,००० वर्षांचे इतरांसारखेच आहे. परंतु त्याच्या मते महायुगाचे प्रारंभी सर्व ग्रह एकत्र असतात आर्यभटाच्या सिद्धान्ताप्रमाणे वर्षमान ३६५ दिवस, १५ घटिका, ३१ पळे, १५ विपळे एवढे आहे. हे मान मूळ सूर्यसिद्धान्तापेक्षा १० विपळानी कमी आहे व आजच्या युरोपीय मानाच्या तुलनेत ७ पळे अ १८. १३ विपळे ३ मिनिटे १९१ सेकंद एवढे जास्त आहे. सूर्यसिद्धान्त व आर्यसिद्धांत यात फरक पडण्याचे कारण सूर्यसिद्धान्तात कलियुगाचा आरंभ गुरुवारी मध्यरात्री असून आर्यभटाने तो शुक्रवार सूर्योदयी मानलेला आहे.
आर्यभटाची सूर्यमालेविषयाची कल्पना
आर्यभटाने 'आर्यभटीय' ग्रंथात सूर्यमालेविषयी कल्पना मांडलेली आहे ती अशी :
'विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी लोंबत आहे. ती तारामंडळाच्या वर्तुळकेंद्राजवळ आहे. पृथ्वीभोवती ग्रहांच्या कक्षा आहेत. कदंब पुष्पात ज्याप्रमाणे मध्ये गोल असून त्यात सर्व बाजूंनी पुष्पतंतू चिकटलेले असतात. त्याप्रमाणे पृथ्वीगोलास सर्व बाजूंनी प्राणी चिकटलेले आहेत. '
आर्यभटाला पृथ्वीच्या दैनंदिन गतीची कल्पना होती. पृथ्वी स्थिर नसून ती परिवलन करते ही कल्पना पाश्चात्यांना उशिरा आली. आर्यभटाने गोलपाद अध्यायात ह्या कल्पनेचे स्पष्टीकरण एका सुंदर उदाहरणाद्वारे केले आहे ते असे :
अनुलोमगतीनौंस्थः पश्चत्यचलं विलोमगं यद्वत ।
अचलानि भानी तद्वत्समपश्चिमगानि लङ्कायाम ॥
'नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाणार्या नावेवरील माणसास ज्याप्रमाणे काठावरील डोंगर, टेकडी किंवा स्थिर वस्तू प्रवाहाच्या उलट दिशेने मागे जात आहेत असे वाटते. त्याचप्रमाणे लंकेतील ( विषुववृत्तावरील ) मनुष्यास नक्षत्रे स्थिर असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे सारख्याच गतीने जात आहेत असे वाटते. '
श्रीपती ( जन्म इ. स. १०३९ ) ह्याने आर्यभटाच्या पृथ्वी फिरते ह्या कल्पनेचे खंडन केले आहे. त्याने पृथ्वी स्थिरच आहे असे आवर्जून सांगितले. ती स्थिती आहे म्हणूनच पक्षी घरट्यातून बाहेर गेल्यानंतर परत घरट्यात येऊ शकतात. मेघही विशिष्ट ठिकाणी जलवर्षाव करू शकतात. पृथ्वी गतिमान असती तर असे घडू शकले नसते. फिरणार्या पृथ्वीसमवेत घरटी व स्थळे पुढे निघून गेली असती. असे श्रीपतीने प्रतिपादन केले.
आर्यभटावर टीका करणारे जसे निघाले तसे त्याचे समर्थकही होते. पृथूदक स्वामी (जन्म इ. स. ८६०) ह्याने आर्यभटाच्या कल्पनेचा पुरस्कार केला :
भपञ्जरः स्थिरो भूरेवावृत्यावृत्य प्रतिदेवसिकौ ।
उदयास्तमयौ संपादयति नक्षत्रग्रहणाम ॥
- 'भगोलाच्या पिंजर्यात ( मध्यभागी ) राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा करून फिरता फिरता पृथ्वीच, नक्षत्र व ग्रहांचे उदयास्तरूपी दैनिक ( चमत्कार ) घडवून आणते. '
आर्यभटाने पृथ्वीचा आकार गोल आहे ह्याचे विवेचन पुढीलप्रमाणे केले आहे.
वृत्तभञ्जरमध्ये कक्ष्या परिवेष्टित: खगमध्यगतः ।
मृञ्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः ॥
'वर्तुळाकार अशा, नक्षत्रांच्या पिंजर्यात ( म्हणजेच नक्षत्रांनी बनलेल्या खगोलाच्या ) मध्यभागी, ( ग्रहांच्या ) कक्षांनी परिवेष्टित अशी पृथ्वी आकाशमध्यावर आहे. तसेच माती, पाणी, तेज व वायू यांनी बनलेला हा भूगोल ( पृथ्वीरूपी गोल ) सर्व बाजूंनी गोल आहे. '
आर्यभटाने सूर्यसंमुख असलेला पृथ्वीचा च नक्षत्रांचा भाग प्रकाशमान असून सूर्यविन्मुख भाग अंधारात असतो असे स्पष्ट प्रतिपादन केले होते. चंद्र ग्रहणाची कारणे राहू केतू नामक दैत्य नसून पृथ्वीची छाया व चंद्र हीच आहेत ही गोष्ट आर्यभटास ज्ञात होती.
आर्यभटास दृक-भेदाचीही कल्पना होती. भूपृष्ठावरून खगोलाचे होणारे दर्शन हे भूमध्यापासून होणार्या दर्शनाशी तुलना केल्यास भिन्न होते. ह्या दोन दिशांत होणारा कोन दृकभेद कोन ( parallax) म्हणून ओळखतात. ही प्राचीन सिद्धान्तकारांस अज्ञात असलेली गोष्ट आर्यभटाने प्रथम सांगितली.
आर्यभटाने हजार वर्षापूर्वी प्रतिपादन केलेले काही सिद्धांत आज आपणास चुकीचे वाटतीलही, परंतु त्याची योग्यता फार मोठी होती हे मान्य करावेच लागेल. आर्यभटापूर्वी अस्तित्वात असलेले खगोलशास्त्रीय सिद्धांत टाकाऊ झाले होते. त्या सिद्धान्तानुसार केलेले गणित व प्रत्यक्ष निरीक्षण ह्यांच्यात मेळ बसत नव्हता. आर्यभटाने गणित व खगोलशास्त्र ह्याच्यात मेळ घालण्याचा प्रयत्न केला. ब्रम्हगुप्तसारख्या छिद्रान्वेषी टीकाकारानेही आर्यभटाच्या ग्रंथाशी तुलना होईल असा ग्रंथ लिहीन असे म्हटले, ह्यात आर्यभटाच्या योग्यतेची ग्वाही दिली गेली नाही काय? विख्यात पंडित अल्बेरुणी हा भारतात आला होता. त्याने भारतीय पंडितांकडून भारतीय वेद, शास्त्रे, पुराणे ह्यांचा अभ्यास केला. त्याने आर्यभटाच्या खगोलशास्त्रीय कर्तृत्वाविषयी अतिशय गौरवाचे उद्गार काढले. एवढ्यावरच न थांबता आर्यभटाचा टीकाकार ब्रम्हगुप्त ह्यास त्याने आर्यभटावर टीका हीन पातळीवरून केल्याबद्दल दोष दिला आहे.
भारतीय गणित व खगोलशास्त्र ह्यांचा आद्य प्रणेता अस वर्णन आर्यभटाचे करावे लागेल

राशी
राशीचा उल्लेख झाला म्हणजे ज्योतिषशास्त्राचा विषय असणार असे प्रत्येकाला वाटते परंतु 'अवकाशवेध' ही वेबसाइट खगोलशास्त्रावरील अभ्यास करणार्यांसाठी असल्याने या विभागात राशी आणि खगोलशास्त्राचा जेवढा संबंध आहे तेवढीच माहिती देण्यात आली आहे.
पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणा करण्यास ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष लागते. रात्री सूर्य आपल्या विरुद्ध दिशेला असल्याने आपणास तारे दिसतात. तर दिवसा सूर्य प्रकाशामुळे आपणास तारे दिसत नाहीत. पृथ्वीवरील वातावरणातील धुळीकणांमूळे सूर्य किरणे सर्वत्र पसरतात आणि सूर्यामागील तारे सूर्य प्रकाशात तारे लुप्त होतात. फार पूर्वीच्या खगोलशास्त्रज्ञांना एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे रात्री सूर्य प्रकाश नसल्यामुळे आपणास तारे दिसतात तसेच दिवसा देखिल तारे आपल्याच जागी असतात. परंतु सूर्य प्रकाशामुळे ते आपणास दिसू शकत नाहीत. नंतर त्यांना असे आढळून आले की सूर्य आणि चंद्र नियमित पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात. फक्त रात्रीच्या चंद्राचा विचार केल्यास दररोज तो आपणास थोडासा पुढे म्हणजे पूर्वेकडे सरकलेला आढळतो. आपल्याला हे सरकणे त्या मागील तार्यांच्या जागेवरून कळते तसेच सूर्याच्या मागील तारे जरी दिसत नसले तरी त्याच्या उगवण्या आधी आणि मावळल्यानंतरच्या काही काळानंतर सूर्य देखिल आपल्या जागे वरून हाललेला दिसतो.
अवकाशाचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशातील जवळ-जवळच्या तार्यांचा मिळून एक तारकासमूह, अशा प्रकारे दिसणार्या सर्व तार्यांना मिळून त्यांचे ८८ तारकासमूह तयार केलेत. नंतर त्यांना असे आढळून आले की ठराविक तारका समूह हे सूर्य-चंद्राच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या मार्गावर आहेत. सूर्य ठराविक काळानंतर एका तारकासमुहामधून दुसर्या तारकासमुहामध्ये जातो. सूर्याच्या या मार्गावर एकूण १२ तारकासमूह असल्याचे आढळून आले. ह्याच तारकासमुहांना नंतर राशी असे नाव देण्यात आले. ह्या राशी म्हणजेच मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.
पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हे दिवस म्हणजे २१ मार्च ( ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो ) आणि २३ सप्टेंबर ( ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो ). आपण विषुववृत्तावर असाल तर ह्या दोन दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो. २१ मार्च ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'वसंतसंपात' म्हणतात तर २३ सप्टेंबर ह्या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास 'शरदसंपात' असे म्हणतात. तसेच २१ जून ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो ह्यालाच उत्तरायण असे देखिल म्हणतात, तर २२ डिसेंबर ह्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. ह्यालाच 'दक्षिणायन' असे देखिल म्हणतात.
ज्यावेळेस राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळेस 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरवातीची रास मानली जाते. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दर ७२ वर्षांनी एक अंश ह्या प्रमाणे पृथ्वीचा अक्ष फिरतो आणि जवळपास २६ हजार वर्षांनी एक फेरा पूर्ण होतो. पृथ्वीच्या अक्षाच्या भ्रमणामुळे विषुववृत्त आणि आयनिकवृत्त ह्यांचे छेदनबिंदू ( 'वसंतसंपात' आणि शरदसंपात ) हे बिंदू देखिल पश्चिमेकडे सरकत असतात. राशींच्या संकल्पनेनंतर आज जवळपास हजार वर्षांनंतर ह्या दोन्ही छेदनबिंदूंची जागा बदललेली आहे व 'वसंतसंपात' बिंदू 'मीन रास' संपवून 'कुंभ राशी' मध्ये प्रवेश करीत आहे तर शरदसंपात बिंदू 'कन्या' राशीमध्ये आहे.
आपण दर १४ जानेवारी रोजी 'मकर संक्रांत' साजरी करतो कारण त्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत असतो.
८८ तारकासमुहांना जेव्हा नावे देण्यात आली तेव्हा त्यांच्या आकाराचा विचार केला गेला. बहुतेक तारकासमुहांच्या आकारामध्ये एखाद्या मनुष्य, प्राणी किंवा पक्षाचा आकार योगायोगाने आढळल्याने त्यांना त्याप्रमाणे नावे देण्यात आलीत. त्यांना नावे देताना देखिल एखाद्या ऐतिहासिक संबंध असलेल्या व्यक्ती अथवा प्राण्याचा विचार केला गेला असावा. कारण बहुतेक तारकासमुहांतील व्यक्ती अथवा प्राण्याचा उल्लेख पुराणकथांमध्ये आढळतो. अशा प्रकारे ऐतिहासिक नावे देण्यामागे दोन कारणे असू शकतात एकतर ती गोष्ट खरी असू शकते किंवा पुराणकथांमुळे तो विशिष्ट तारकासमूह चांगला लक्षात राहतो.
मेष राशीचा आकार मेंढ्याप्रमाणे, वृषभ राशीचा आकार बैलाप्रमाणे, मिथुन राशीचा आकार दोन लहान मुलांप्रमाणे, कर्क राशीचा आकार खेकड्याप्रमाणे, सिंह राशीचा आकार सिंहाप्रमाणे, कन्या राशीचा आकार मुलीप्रमाणे, तूळ राशीचा आकार तराजूप्रमाणे, वृश्चिक राशीचा आकार विंचूप्रमाणे, धनु राशीचा आकार धनुष्यधारी मनुष्याप्रमाणे, मकर राशीचा आकार बकरीप्रमाणे, कुंभ राशीचा आकार पाणी वाहणार्या मनुष्याप्रमाणे, मीन राशीचा आकार समुद्रातील दोन माश्यांप्रमाणे दिसतो.

.... प्रेम आंधळ असतं !
......तिला जगातल्या सगळ्या सगळ्यांचा राग येत असे, अगदी तिच्या लहानग्या गोंडस बहिणीचा सुद्धा. तिच्या आई बाबांनी खूप प्रयत्न केले तिच्या मनातली ती विचित्र अढी काढण्याचा, पण तिने मात्र डोक्यात राख घालून घेतलेली. त्याला कारणही होते तसेच ... ऐन तारुण्याच्या भरात झालेला तो अपघात आणी त्यात गेलेली तिची दृष्टी ...
.... पण आता तिच्या आयुष्यात आता तो आला होता. प्रेमाचे गोड गुपित होते त्यांचे. त्याच्यावर मात्र ती भरभरून प्रेम करायची. त्याच्या सहवासात तिच्या चित्तवृत्ती फुलायच्या. त्याला नेहमी म्हणायची ती "मी जर का बघू शकले ना परत, तर लग्न करायचंय मला तुझ्याशी."
..... अचानक एका दिवशी तिला कोणीतरी डोळे दान केले होते. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीये नंतर काही दिवसांनी तिला परत पुर्ववत दिसू लागते. बरेच दिवस झालेले असतात पण तो काही तिला अजून भेटलेला नसतो. ती व्याकुळ.
..... शेवटी तो दिवस उजाडतोच. घाई घाईने ती ठरल्या वेळे अगोदरच पोहचते. लाल रंगाचा सदरा घालून येणार असतो तो. तिची नजर ठरत नसते ... सारखी भिरभिरत शोधत असते त्याला. लांबूनच दिसतो तो. तिच्या डोक्यात जणू हजार बॉम्बं फुटतात. तोच काळा चष्मा आणी तोही असतो आंधळा.
..... लग्नाला ती मग साफ नकार देते. तो मोडून पडतो .... परत फिरतो आपल्या रस्त्यावर. जातांना तिला म्हणतो .... " नाहीस केले लग्न माझ्याशी, ते ठीक आहे ... पण डोळे मात्र माझे तू नीट सांभाळ".

इस्लाम धर्म
इस्लाम धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम अथवा मुसलमान हा एक अब्राहमीक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. इस्लाम धर्माचे पालन करणार्या लोकांची संख्या आजमितीस अंदाजे १५० कोटी आहे. व लोकसंख्येनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. यातील १३ कोटी इस्लाम धर्मीय भारतात आहेत व भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.
इस्लामची तत्वे
अल्लाह हा एकच इश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
मुहम्मद हा अल्लाहचा शेवटचा प्रेषीत आहे. (महम्मदे रसूल-अल्लाह)
अल्लाह निराकार असून इस्लाममध्ये अल्लाहला इतर कोणत्याही स्वरुपात पूजणे मना आहे.
दिवसातून पाच वेळा नमाज पढणे
आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरीबांसाठी दान करणे. (जकात)
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम ( अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ शरणागती पत्करणे व भावार्थ परमेश्वरापुढे शरणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तीमान म्हणून पुजणे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे त्यासाठी साधकाने परमेश्वराला पुजले पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना ( अनेकेश्वरवाद) पुजले नाही पाहिजे.
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे कि परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबरा करवी कुराण उलगडवले. याकामी गॅब्रिएल या देव दूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चाली रिती व बोली ( सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानले जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाह ने अनादी कालापासूनच्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या आगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमीक धर्म जे आज यहुदी व ख्रिस्ती धर्माने ओळखले जातात त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पुर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मानतात व खर्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचे इस्लामचे साधक मानतात.
इस्लाम मध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. जी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलिकडे इस्लाम मध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणाली मध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालिरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे असे इस्लामचे साधक मानतात.
इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शिया व सुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथात मोडतात. या पंथातही अनेक उपप्रकार आहेत. शिया व सुन्नी ही मुहम्मद पैंगबराच्या म्रुत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकिय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. पहिल्या तीन खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर चौथे खलीफांना मानणारे शिया पंथिय बनले.

मोहम्मद पैगंबर
मोहम्मद पैगंबर (९ रबीउल अव्वल हिजरी पुर्व ५३ - १२ रबीउल अव्वल हिजरी ११) हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते. जगातील एका महत्त्वपुर्ण धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्वाचे स्थान आहे.
प्रारंभिक जीवन
मोहम्मद यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात ९ रबीउल अव्वल, हिजरी पुर्व ५३ तदनुसार एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला. त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे काका अबू तालिब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने मोहम्मद यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सिरीया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. वयाच्या २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४० वर्ष इतके होते.
कुराणाचे अवतरण
मोहम्मद यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जावून दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील एका दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदुताने त्यांना अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". मोहम्मदांनी देवदुताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदुताने दुस-यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिस-यांदा देवदूत म्हणाला:
वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.
ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरीत झालेल्या ओळी मानल्या जातात. मोहम्मदंना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध्ये कुराणाची निर्मिती झाली. काही पाश्चात्य इतिहासकारांच्या मते मोहम्मदांना अपस्माराचा आजार होता व त्या झटक्यांमध्ये त्यांना ईश्वरी संदेश प्राप्त होत असे.
मोहम्मदांनी इस्मालचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्विकारला. मोहम्मद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकुण ४० व्यक्तींनी इस्लामचा स्विकार केला.
विरोधाची वर्षे
मोहम्मद मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. मोहम्मद यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने मोहम्मदांच्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठीत लोकांच्या मध्यस्थीने मोहम्मद यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आल. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे काका अबू तालिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्नी खदिजा यांचेही निधन झाले.
मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने मोहम्मदांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले.
मदिनेकडे प्रस्थान
वयाच्या ५३व्या वर्षी मोहम्मद मक्का सोडून मदिनेस गेले. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण मोहम्मदांना या घटनेची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देवून ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र अबू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
मोहम्मदांच्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरूवात झाली.
विरोधकांशी युद्ध व तह
मदिनेस पोहचल्यानंतर मोहम्मदांची व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतू लागले. मोहम्मदांनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. मोहम्मदांच्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये मोहम्मदांनी विरोधकांचा पराभव केला.
या लढायांतील विजयानंतर मोहम्मदांनी आपल्या १४०० सहकार्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. मोहम्मदांनी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दुतासोबत संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये मोहम्मद आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की मोहम्मदांनी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. मोहम्मदांनी हा तह मान्य केला.
मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटूता आली होती. मोहम्मदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर ते खैबर या ठिकाणी जावून वसले, परंतु तिथेही मोहम्मदांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.
मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये मोहम्मदांनी १०,००० सहकार्यांना घेवून मक्केवर स्वारी केली. या युद्धात मोहम्मदांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गटचे गट इस्लामचा स्विकार करू लागले.
सन १० हिजरी मध्ये मोहम्मदांनी एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:
"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पुजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी मोहम्मद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."
याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला
मृत्यू
शेवटच्या हज यात्रेनंतर मोहम्मद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे") हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र हा पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आला.
प्रभाव
मोहम्मचांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मुर्तिपुजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.
पण याहीपेक्षा मोहम्मदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दुरगामी परिणाम अधिक महत्त्वपुर्ण ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. मोहम्मदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रांस व स्पेनपासून संपुर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११]
आधुनिक जगातही जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर मोहम्मद यांचा प्रभाव निःसंशय आहे.

Subscribe to:
Posts (Atom)